Atoms, the smallest particles of matter that retain the properties of the matter, are made of protons, electrons, and neutrons. |
अणू, पदार्थाचे गुणधर्म टिकवून ठेवणारे सर्वात लहान कण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनपासून बनलेले असतात. |
Protons have a positive charge, Electrons have a negative charge that cancels the proton's positive charge. |
प्रोटॉनमध्ये धन (पॉजिटिव) प्रभार असतो, इलेक्ट्रॉनमध्ये ऋण (निगेटिव) प्रभार असतो जो प्रोटॉनचा धन (पॉजिटिव) प्रभार रद्द करतो.
|
Neutrons are particles that are similar to a proton but have a neutral charge. |
न्यूट्रॉन कण जे प्रोटॉनसारखेच असतात परंतु त्यांचा प्रभार नूट्रल (तटस्थ) असतो. |
There are no differences between positive and negative charges except that particles with the same charge repel each other and particles with opposite charges attract each other. |
समान प्रभार असलेले कण एकमेकांना मागे ढकलतात आणि विरुद्ध प्रभार असलेले कण एकमेकांना आकर्षित करतात, हे वगळता धन (पॉझिटिव्ह) प्रोटॉन आणि ऋण (नेगटिव) प्रभारांमध्ये कोणताही फरक नसतो.
|
If a solitary positive proton and negative electron are placed near each other they will come together to form a hydrogen atom. |
जर एक धन (पॉझिटिव्ह) प्रोटॉन आणि ऋण (नेगटिव) इलेक्ट्रॉन एकमेकांजवळ आले तर ते एकत्र येऊन हायड्रोजन अणू तयार करती |
This repulsion and attraction (force between stationary charged particles) is known as the Electrostatic Force and extends theoretically to infinity, but is diluted as the distance between particles increases. |
हे प्रतिकर्षण आणि आकर्षण (स्थिर चार्ज असलेल्या कणांमधील बल) इलेक्ट्रोस्टॅटिक बल म्हणून ओळखले जाते आणि सैद्धांतिकदृष्ट्या अनंतापर्यंत विस्तारते, परंतु कणांमधील अंतर वाढते म्हणून ते कमी होते. |
When an atom has one or more missing electrons it is left with a positive charge, and when an atom has at least one extra electron it has a negative charge. |
जेव्हा अणूमध्ये एक किंवा अधिक गहाळ इलेक्ट्रॉन असतात तेव्हा ते धनात्मक प्रभार असते आणि जेव्हा अणूमध्ये कमीतकमी एक अतिरिक्त इलेक्ट्रॉन असतो तेव्हा त्याच्याकडे ऋण प्रभार असते. |
Having a positive or a negative charge makes an atom an ion. |
अणूवर धनात्मक किंवा ऋणात्मक विद्युत आवेश असल्यास तो आयन म्हणून ओळखला जातो |
Atoms only gain and lose protons and neutrons through fusion, fission, and radioactive decay. |
अणू प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केवळ संलयन, विखंडन, आणि किरणोत्सर्गी क्षयाच्या प्रक्रियेद्वारे प्राप्त करतात किंवा गमावतात. |
Although atoms are made of many particles and objects are made of many atoms, they behave similarly to charged particles in terms of how they repel and attract. |
अणू अनेक कणांपासून बनलेले असले तरी, आणि वस्तू अनेक अणूंपासून तयार झाल्या असल्या तरी, ते परस्पर विकर्षण आणि आकर्षणाच्या दृष्टीने आवेशित कणांप्रमाणे वर्तन करतात |
In an atom the protons and neutrons combine to form a tightly bound nucleus. |
अणूमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र येऊन घट्ट बांधलेला नाभिक तयार करतात |
This nucleus is surrounded by a vast cloud of electrons circling it at a distance but held near the protons by electromagnetic attraction (the electrostatic force discussed earlier). |
हा नाभिक इलेक्ट्रॉन्सच्या विस्तृत ढगाने वेढलेला असतो, जे नाभिकाच्या आसपास एक विशिष्ट अंतरावर फिरत असतात, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक आकर्षण (पूर्वी चर्चा केलेली इलेक्ट्रोस्टॅटिक शक्ती) मुळे ते प्रोटॉन्सच्या जवळ अडकलेले असतात |
The cloud exists as a series of overlapping shells / bands in which the inner valence bands are filled with electrons and are tightly bound to the atom. |
या ढगात एकापाठोपाठ असलेली आवरणे / पट्टे असतात, ज्यामध्ये आतील व्हॅलेन्स पट्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉन्स भरलेले असतात आणि ते अणूसोबत घट्टपणे जोडलेले असतात |
The outer conduction bands contain no electrons except those that have accelerated to the conduction bands by gaining energy. |
बाह्य कंडक्शन पट्ट्यांमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉन्स नसतात, फक्त ते इलेक्ट्रॉन्स असतात जे उर्जा प्राप्त करून कंडक्शन पट्ट्यांमध्ये गतीमान झाले आहेत. |
With enough energy an electron will escape an atom (compare with the escape velocity of a space rocket). |
पुरेशी ऊर्जा मिळाल्यास, एक इलेक्ट्रॉन अणूच्या बाहेर निघून जाईल (अंतराळ रॉकेटच्या पलायन वेगाशी तुलना केली जाऊ शकते). |
When an electron in the conduction band decelerates and falls to another conduction band or the valence band a photon is emitted. |
जेव्हा कंडक्शन पट्ट्यातील एक इलेक्ट्रॉन गती कमी करतो आणि दुसऱ्या कंडक्शन पट्ट्यात किंवा व्हॅलेन्स पट्ट्यात खाली येतो, तेव्हा एक फोटॉन उत्सर्जित होतो. |
This is known as the photoelectric effect. |
हे फोटोइलेक्ट्रिक प्रभाव म्हणून ओळखले जाते, ज्यात प्रकाशामुळे इलेक्ट्रॉन्स अणूपासून बाहेर पडतात. |